कप आणि हँडल पॅटर्न म्हणजे काय?

तांत्रिक विश्लेषणाचा भाग म्हणून, चार्ट पॅटर्नचा अभ्यास करताना, किमतीच्या संभाव्य हालचालींबद्दल मौल्यवान माहिती मिळते. 'कप आणि हँडल' (Cup and Handle) पॅटर्न हा त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रकार आहे. हा एक बुलिश (तेजीचा) पॅटर्न असून, याचा अभ्यास करून तुम्ही तेजीच्या ब्रेकआउटचा अंदाज लावू शकता आणि त्यानुसार तुमची एंट्रीची योजना अधिक अचूक करू शकता.


कप आणि हँडल पॅटर्न चहाच्या कपासारखा दिसतो. साधारणपणे, एखादा स्टॉक आधीच तेजीत असताना, त्याची किंमत स्थिर होते. त्यावेळी ‘कप’चा आकार तयार होतो आणि त्यानंतर 'हँडल'चा छोटासा आकार बनतो. हा पॅटर्न पूर्ण झाल्यावर स्टॉकची किंमत पुन्हा वाढू लागते.

कप आणि हँडल पॅटर्नची रचना

कप (Cup): हा इंग्रजी 'U' अक्षरासारखा दिसतो. स्टॉकची किंमत हळूहळू खाली येते आणि नंतर पुन्हा पहिल्या उच्च पातळीवर पोहोचते. हे दर्शवते की विक्रीचा दबाव कमी झाला आहे आणि खरेदीदार पुन्हा बाजारावर नियंत्रण मिळवत आहेत.

हँडल (Handle): कप तयार झाल्यावर, स्टॉकच्या किमतीत थोडीशी घसरण होते किंवा किंमत एका मर्यादेत राहते. यामुळे ‘हँडल’ तयार होतो. हा ब्रेकआउटच्या आधीचा शेवटचा छोटासा चढ-उतार असतो.

ब्रेकआउट (Breakout): जेव्हा स्टॉकची किंमत 'कप'च्या वरच्या रेजिस्टन्स (resistance) पातळीच्या वर जाते, तेव्हा या पॅटर्नची पुष्टी होते. हे सहसा मोठ्या व्हॉल्यूमसोबत (volume) होते, ज्यामुळे तेजीची नवीन लाट येऊ शकते.


कप आणि हँडल पॅटर्ननुसार ट्रेडिंग कसे करावे

एन्ट्री पॉइंट (Entry Point)

  • स्टॉकची किंमत हँडलच्या रेजिस्टन्सच्या वर मोठ्या व्हॉल्यूमसोबत जाते तेव्हा तुम्ही एन्ट्री करू शकता.

  • उच्च-गुणवत्तेचा ब्रेकआउट म्हणजे किंमत फक्त वर जाण्याऐवजी रेजिस्टन्सच्या वर स्थिर होते.

  • तुम्ही लगेच ५०% शेअर्स खरेदी करू शकता आणि बाकीचे ५०% नंतर दुसऱ्या एका कॅंडलची खात्री झाल्यावर घेऊ शकता.

टारगेट प्राईस (Target Price) तुमचे टार्गेट ठरवण्यासाठी दोन सोप्या पद्धती आहेत:

  • चार्टनुसार: कपच्या तळापासून त्याच्या रेजिस्टन्स पातळीपर्यंतचे अंतर मोजा. हेच अंतर ब्रेकआउट पॉइंटमध्ये जोडा.

  • टार्गेट = ब्रेकआउट पातळी + (रेजिस्टन्स - कपचा तळ)

स्टॉप-लॉस (Stop-Loss)

  • अयशस्वी ब्रेकआउटपासून वाचण्यासाठी, तुमचा स्टॉप-लॉस हँडलच्या तळाशी किंवा ब्रेकआउट कॅंडलच्या तळाशी ठेवा.

  • स्टॉप-लॉस खूप जवळ ठेवू नका, कारण लहान चढ-उतार सामान्य आहेत.

अतिरिक्त टिप्स

  • कपचा आकार ‘V’ ऐवजी ‘U’ सारखा गोल असावा, हे चांगल्या संचयनाचे (accumulation) लक्षण आहे.

  • कप जेवढा मोठा, ब्रेकआउट तेवढा मजबूत असतो.

  • व्हॉल्यूम, RSI (Relative Strength Index) किंवा MACD (Moving Average Convergence Divergence) यांसारख्या इंडिकेटर्सचा वापर करून ब्रेकआउटची पुष्टी करा.

  • हे पॅटर्न तेजीच्या बाजारात किंवा मजबूत क्षेत्रात अधिक विश्वसनीय असतात.

चार्टिंगचा अभ्यास: तुमच्या चार्टिंग ॲपमध्ये (उदा. Tradingview) दैनिक चार्टवर कप आणि हँडल पॅटर्न शोधा. खालील गोष्टी चिन्हांकित करा:

  • कपचा तळ आणि वरची कडा (रेजिस्टन्स)

  • हँडलचा आकार (एक लहान ‘U’ किंवा खाली जाणारा चॅनेल)

  • संभाव्य ब्रेकआउट, एन्ट्री, स्टॉप-लॉस आणि टार्गेट क्षेत्र.

होमवर्क

खालील स्टॉक्सच्या चार्टचा अभ्यास करा आणि त्यापैकी कोणत्या स्टॉकने ‘कप आणि हँडल’ पॅटर्न तयार केला आहे किंवा करत आहे ते ओळखा: १. सुंदरम फास्टनर्स लि. (SUNDRMFAST) २. एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लि. (NYKAA)

या स्टॉक्सच्या किमतीच्या हालचालींचा अभ्यास करा, कप आणि हँडल पॅटर्न काढा आणि ब्रेकआउटला व्हॉल्यूमची मदत आहे का ते पहा. तुम्ही हे स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता.

टीप: हे विश्लेषण केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि कोणत्याही प्रकारची शिफारस नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

Leave your comment