आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (Mastering Money Management)
आर्थिक व्यवस्थापन हा असा विषय आहे जो आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सर्वात दुर्लक्षित आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हेच चित्र पाहायला मिळते.
तुमचा पहिला पगार असो किंवा आयुष्यभर राबून कमावलेली तुमची संपत्ती, जर तुम्हाला त्या पैशांचा व्यवस्थापन करता येत नसेल तर सर्व व्यर्थ जाते.
हा कोर्स महत्त्वाचा आहे कारण यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करू शकता आणि भविष्यात काळजीमुक्त होऊ शकता.
बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट
मला खात्री आहे की तुम्ही कधी ना कधी निफ्टी, सेन्सेक्स, मार्केट कॅपिटलायझेशन, शॉर्ट सेलिंग, आयपीओ आणि अशा अनेक शब्दांचा सामना केलाच असेल. या संकल्पना भितीदायक वाटतात पण प्रत्यक्षात त्या अनेक उदाहरणांसह मजेदार रीतीने शिकवल्या गेल्या तर समजण्यास अतिशय सोप्या असतात. या कोर्समध्ये ७५ पेक्षा जास्त संकल्पना आहेत ज्या नवशिक्यांसाठीतर उपयुक्त आहेतच शिवाय नॉन फायनान्स पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहेत.
मैत्री म्युच्युअल फंडशी :
आपली संपत्ती वाढवण्याबद्दल उत्सुक आहात? मग हा कोर्स तुमच्यासाठीच आहे! तुम्ही नवे गुंतवणुकदार असाल किंवा ज्ञान वाढवण्यासाठी इच्छुक असाल, तर म्युच्युअल फंड्सच्या रोमांचक जगात यशस्वीपणे वावरायला शिकवणारा हा कोर्स तुमच्यासाठी आहे. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणुकीचे अचूक निर्णय कसे घ्यावे ते शिकुया !